आयुषमान भारत योजनेंतर्गत, शालेय आरोग्य कार्यक्रम
(School Health Programme)
प्रशिक्षणासाठी शाळा व प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व शिक्षक यांची लिंकद्वारे नोंदणी करणेबावत.
सदर ONLINE प्रशिक्षणासाठी निकषाप्रमाणे प्रत्येक शाळेतील प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक यांनी स्वतःची नोंदणी करून शाळेतील दोन शिक्षक (एक पुरुष व एक स्त्री) यांची पुढे दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करावी. या लिंकद्वारे दिनांक ३ डिसेंबर २०२० रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे, तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीचा संपर्कांसाठी स्वतःचा Gmail id आवश्यक असून लिंकवर तो देण्यात यावा. सदर प्रशिक्षणार्थीचे डिसेंबर महिन्यात online प्रशिक्षण होणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी निकषाप्रमाणे १००% नोंदणी होणेबाबत आपल्या स्तरावरून त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
मुख्याध्यापक | दोन शिक्षक (एक पुरुष व एक स्त्री)
दिनांक ३ डिसेंबर २०२० रात्री १२ वाजेपर्यंत
सदर प्रशिक्षणार्थीचे डिसेंबर महिन्यात online प्रशिक्षण होणार आहे.
नोंदणीसाठी लिंक

भारत सरकारने ‘आयुषमान भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचे मार्फत ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ (School Health & Wellness Programme) सुरु केला आहे. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळांमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी, जाणीवा या विषयी जनजागृती व जबाबदारी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या राज्यामध्ये आयुषमान भारत उपक्रमांतर्गत SCHOOL HEALTH AND WELLNESS कार्यक्रम औरंगाबाद, बीड, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित शाळांमध्ये राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत SCHOOL HEALTH AND WELLNESS AMBASSADOR म्हणून online प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
#avirateducation
/*54745756836*/