दहावी आणि बारावीची परीक्षा वेळापत्रकानुसारच:शाळा आणि महाविद्यालये यांना जरी ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली असली तरीही दहावी आणि बारावीच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या परीक्षांसाठी असणारी परीक्षा केंद्र सुरु राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालये आणि आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे सूचित करण्यात येत आहे.
तथापि, सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व नगर पंचायत क्षेत्रातील १०वी आणि १२वी च्या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यात याव्यात असाही निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हे परिपत्रक काढण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. सध्या राज्यात एकूण २२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकराने सर्व शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.
Official News Channel Link
Zeenews
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/confirmed-all-school-closed-remains-state-due-to-corona/512619
ABP MAJHA
https://marathi.abplive.com/news/maharashtra/school-and-colleges-in-maharashtra-will-be-shut-due-to-coronavirus-govt-declares-school-shut-750383
/*54745756836*/
Best Aviator download APK for Android 2025