खरे बोलणे ही खूप चांगली सवय आहे. जर तुम्ही नेहमी खरे बोललात तर तुम्ही स्वतःला अनेक संकटांपासून वाचवू शकता !
Why always speak the truth?
सर्वसाधारणपणे ‘खरे बोलणे‘ स्वतःच्या हिताचे असते. खरे बोलणाऱ्या व्यक्तीवर सर्व लोक विश्वास ठेवतात. समाजात त्यांची पत राहते व आर्थिक संकट किंवा अन्य संकटे आली असता सामान्यपणे समाजातील माणसे त्याच्या सहाय्याला धावतात. याच्या उलट खोटे बोलणाऱ्या व्यक्तीवर कोणी विश्वास ठेवीत नाही. समाजात त्याची पत रहात नाही व संकट प्रसंगी त्याच्या मदतीला कोणी धावून जात नाही.
खरे कधी बोलावे व खोटे कधी बोलावे यालासुद्धा काही तारतम्य आहे. धूर्त लबाड माणसे, स्वार्थ साधण्यासाठी वाटेल त्या थराला जाणारी माणसे, समाजद्रोही व राष्ट्रद्रोही माणसे यांच्याशी खरे बोलणे धोक्याचे असते. किंबहुना अशा लोकांच्या बाबतीत खोटे बोलून त्यांना मार्गाला लावणे हेच सर्वांच्या हिताचे असते.
एकदा माणूस खोटे बोलला की ते खोटे पचविण्यासाठी त्याला अनेक वेळा खोटे बोलावे लागते. इतके खोटे बोलून सुद्धा सरते शेवटी सत्य बाहेर येतेच व परिणामी त्या माणसाची पूर्ण फजिती होते.
कोणताही व्यक्ती दिवसभर का बरं खोटं बोलेल. जर का अगदी गरजच असेल, तर तो खोटं बोलतो. हे अगदी खरे आहे,पण विनाकारण जर कोणी व्यक्ती खोटं बोलत असेल तर त्याच्या मनात नक्कीच खोट असू शकते. कारण, एक व्यक्तीला जर दुस-या व्यक्तीला फसवायचे असेल, तरी तो सारखं खोटं बोलू शकतो.
खरे बोलण्याने व्यक्तीचे, कुटुंबाचे, समाजाचे किंवा राष्ट्राचे खूप नुकसान होत असेल तर अशा प्रसंगी खोटे बोलून वेळ निभावून नेणे हेच सर्वांच्या हिताचे असते.
पूर्व जीवनात काही घडलेल्या गोष्टी किंवा घटना ज्या सर्वसाधारणपणे गुप्त ठेवल्या जातात त्या घटना किंवा गोष्टी कुठल्याही परिस्थितीत व कोणालाही उघड करू नयेत.
माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे कारण ते नेहमी खरे बोलतात.
विशेषकरून स्त्री-पुरुषांनी विवाह झाल्यानंतर ‘खोटे बोलणे पाप आहे‘ या कल्पनेच्या आहारी जाऊन किंवा ‘सत्य सांगितले नाही तर मनाला खात राहते‘ या भावनेच्या आहारी जाऊन सत्य सांगणे कोणाच्याच हिताचे नसते. थोडक्यात, सामान्यपणे खरे बोलावे व खोटे बोलू नये, परंतु विशेष माणसांच्या व प्रसंगांच्या बाबतीत खरे बोलावे की खोटे बोलावे हे सर्व तारतम्य पाहून ठरवावे.
3 thoughts on “नेहमी खरेच का बोलावे ? | Why always speak the truth? in Marathi”
Jumped into wildbandito1 for a few rounds. The theme’s pretty cool, and the features kept me entertained. Worth a go if you’re looking for a bandit themed slot. Check it out at: wildbandito1
Yo, awin68 is legit! Good selection of games and the site layout is clean. I’d recommend it if you’re looking for a reliable spot to wager. Hit up awin68
Jumped into wildbandito1 for a few rounds. The theme’s pretty cool, and the features kept me entertained. Worth a go if you’re looking for a bandit themed slot. Check it out at: wildbandito1
1y58z9
Yo, awin68 is legit! Good selection of games and the site layout is clean. I’d recommend it if you’re looking for a reliable spot to wager. Hit up awin68