प्रदूषण मुक्त दिवाळी शपथ 2019

By AviratEducation

Updated on:

Follow Us
---Advertisement---
दिवाळी म्हणजे दीपोत्सव
    दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा सण, पणत्या, आकाशदिवे, रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मिठाई आणि फराळाची देवाण-घेवाण, आनंदाचे उधाण, जुने मतभेद हेवेदावे विसरून एकमेकांना आनंदाने भेटण्याचे दिवस, नातेवाईक, भाऊ-बहीण यांच्या भेटीचा सण आणि त्याचबरोबर मुलांचा उत्साह, आनंद म्हणजे फटाके! फटाक्यांची आतषबाजी, धूमधडाका. रात्र झाली की हवेत उडणा-या रंगीबेरंगी फटाक्यांनी आसमंत उजळून निघतो. फटाक्यांच्या धूमधडाक्याने परिसर व्यापून जातो.


                        मुलांच्या उत्साहाला आणि मोठ्यांच्या अतिउत्साहाला उधाण येते. हेच फटाके ध्वनी आणि वायुपदूषणाला कारणीभूत ठरत असतात याकडे मात्र आपले लक्ष नसते किंवा असून सुद्धा त्याकडे कानाडोळा केला जातो. फटाक्यांच्या आवाजाने ध्वनिपदूषण तर होतेच, परंतु फटाक्यांच्या धुरामुळे हवेच्या पदूषणाचा स्तरही वाढतच जातो. यामुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार वाढतात, वृद्धांना ध्वनी आणि वायुपदूषणाचा भयंकर त्रास होतो, लहान मुले, नवजात अर्भके, गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 
                                                   दूषण मुक्त दिवाळी शपथ 
दूषण मुक्त दिवाळी शपथ  ( PDF  डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा )

/*54745756836*/

Leave a Comment