अभ्यास कसा करावा ? (3R Formula) Read, Remember and Reproduce

By AviratEducation

Updated on:

Follow Us
---Advertisement---

 अभ्यास कसा करावा ?

बहुतेक विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा हेच समजत नाही. नुसते पुस्तकाचे वाचन केले म्हणजे अभ्यास केला, अशी अनेक विद्यार्थ्यांची गैरसमजूत असते. अभ्यास करण्याच्या काही विशिष्ट पद्धती असतात. या सर्व पद्धती थोडक्यात खालील प्रमाणे सांगता येतील

 How-to-study?-3R-Formula

 १) (3 R Formula)  (Read, Remember and Reproduce) याचाच अर्थ असा की,

1) पुनः पुन्हा वाचा,

2) वाचलेले स्मरणात ठेवा व

3) स्मरणात ठेवलेले कागदावर लिहून काढा. यालाच अभ्यास करणे असे म्हणतात.

 

२)पुस्तकाचे वाचन करीत असताना पॅरेग्राफ किंवा परिच्छेद असतात. दोन-चारदा वाचल्यानंतर प्रत्येक परिच्छेदाचा सारांश काढायचा. दहा-बारा ओळींचा परिच्छेद असेल तर तीन चार ओळींत सारांश काढायचा. अशा प्रकारे अभ्यास केल्याने वार्षिक परीक्षेच्या वेळेला उजळणी (Revision) करताना हा सारांश अत्यंत उपयुक्त ठरेल.

 

३)शाळेमध्ये शिक्षक जो धडा किंवा पाठ शिकविणार असतील तो धडा किंवा पाठ घरी प्रथम वाचून शाळेत जाणे. शिक्षक, शाळेत तो धडा किंवा पाठ शिकविताना नीट लक्ष देऊन ऐकणे व शाळेतून घरी परत आल्यावर शिक्षकांनी शिकविलेला तो धडा किंवा पाठ पुन: वाचणे. या पद्धतीने अभ्यासाची तीनदा उजळणी होईल. अशा पद्धतीने अभ्यास करण्याच्या दृष्टीने शिक्षक व विद्यार्थ्यांची एक जबाबदारी आहे.

 

)आपण उद्या काय शिकविणार ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले पाहिजे व विद्यार्थ्यांनीसुद्धा तसे करण्यास शिक्षकांना आवर्जून विनंती केली पाहिजे.

 

५) शिकविता शिकविता शिकणे, हा अभ्यास करण्याचा उत्तम मार्ग.

आपल्या वर्गामधील गरजू विद्यार्थ्यांना जर शिकविण्याचा प्रयत्न केला तर त्याचा दुहेरी फायदा होतो. एका बाजूने आपला अभ्यास चांगला होतो व दुसऱ्या बाजूने आपल्याच वर्गातील विद्यार्थ्याला ज्ञानदान केल्याचे श्रेय मिळते. दुसऱ्यांना शिकविताना आपला अभ्यास चांगला होतो. याचे मुख्य कारण असे की, आपल्याला तो विषय चांगला समजल्याशिवाय आपण तो विषय दुसऱ्यांना शिकवूच शकत नाही.

 

६) अभ्यास करण्याची या पद्धतीप्रमाणे दोन किंवा दोनापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम घरी अभ्यास करून मग कोणाच्या तरी घरी त्या सर्वांनी एकत्र यावयाचे व एकमेकांना प्रश्न विचारून चर्चा करीत करीत एकमेकांची परीक्षा पहायची. या पद्धतीने अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळविता येईल. थोडक्यात, अभ्यास करणे याचाच अर्थ असा की, एखादी गोष्ट पुनः पुन्हा (Revision) करणे हे होय.

 

‘There is no vision without revision’.

 

विद्यार्थ्यांनी हा सिद्धांत लक्षात ठेवून रिव्हीजन करण्याकडे दुर्लक्ष करू नये. अभ्यास करताना मन प्रसन्न कसे ठेवावे?

 

 अभ्यास करताना प्रत्येक विद्यार्थ्याने एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे तो हा की, आपण अभ्यास करतो ते आई बापावर किंवा शिक्षकावर उपकार करण्यासाठी नव्हे. अभ्यास करणेहे विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम कर्तव्य होय. या कर्तव्य धर्माचे पालन जो विद्यार्थी करत नाही तो विद्यार्थी देवाच्या दरबारात गुन्हेगार ठरतो.

 

दहावी बोर्डाच्या निकालानंतर पुढे काय | What Next after 10th Board Results

 

/*54745756836*/

1 thought on “अभ्यास कसा करावा ? (3R Formula) Read, Remember and Reproduce”

  1. Cảm ơn vì bài viết cực hay, đúng lúc đang cày sự kiện mới thì đọc được! Thời gian rảnh mình toàn vào win55 chơi vài ván slot để xả stress, mà nổ hũ gần đây ổn phết. Giờ chơi là phải theo trend, không lại chậm chân mất quà!

    Reply

Leave a Comment