Maharashtra SSC Board Exam 2022 instructions for students
हे करावे
१. परीक्षा दालनात प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर उपस्थित रहावे.
२. स्वतःच्या बैठक क्रमांकावरच बसावे.
३. उत्तरपत्रिकेवरील पृष्ठ क्र. २ वरील सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे.
४. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर विहीत केलेल्या जागेत बैठक क्रमांक, (अंकी व अक्षरी)
केंद्रक्रमांक,
दिनांक, विषय, माध्यम लिहून स्वाक्षरी करावी.
५. बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर तो तपासून बैठक क्रमांक स्वतःचाच आहे याची खात्री करावी.
६. स्वतःच्या हातानेच उत्तरपत्रिकेवर दिलेल्या विहीत जागेतच बारकोड स्टिकर चिकटवावा.
७. फॉर्म क्रमांक १ वर स्वतःच्या बैठक क्रमांकासमोरच स्वाक्षरी करावी.
८. उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे देण्यापुर्वी विद्यार्थ्यांनी स्वतः मुख्य उत्तरपत्रि तसेच घेतलेल्या सर्व
पुरवण्यांवर होलोक्राफ्ट स्टिकर चिकटविणे आवश्यक आहे.
हे करू नये
१. दुसऱ्याच्या बैठक क्रमांकावर बसू नये
२. दुसऱ्याचा बारकोड स्वतःच्या उत्तरपत्रिकेवर चिकटवू नये. असे केल्यास विद्यार्थी पूर्णतः
जबाबदार राहील.
३. बारकोड स्टिकर कोणत्याही प्रकारे खराब करू नये. केल्यास हा गैरप्रकार समजण्यात येईल.
४. उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय कुठलाही अनावश्यक मजकूर, स्वतःचे नांव, पत्ता, बैठक क्रमांक,
मोबाईल नंबर देवदेवतांची नांवे, पास करण्याची धमकी / विनंती तसेच चिन्हांकित खुणा करून
कोणत्याही प्रकारे ओळख दर्शविण्याचा प्रयत्न करू नये, केल्यास हा गैरप्रकार समजण्यात येऊन
नियमानुसार संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द ठरविण्यात येईल.
५. विद्यार्थ्यांनी पुरवणी स्टेपल करू नये. केल्यास गैरमार्ग समजण्यात येईल.
६. पुरवणी बांधण्यासाठी पांढऱ्या दोऱ्या व्यतिरिक्त अन्य रंगाचे दोरे वापरू नयेत वापरल्यास
गैरमार्ग समजण्यात येईल.
सूचना
१) जे उमेदवार परीक्षागृहात अथवा परीक्षागृहाबाहेर कॉपी करतांना अथवा अन्य गैरप्रकार करतांना आढळतील,तसेच परीक्षेच्या कामाशी संबंध नसलेल्या बाह्यव्यक्ती, परीक्षा केंद्राजवळ उमेदवारांना गैरप्रकार करण्यास मदत करीत असतांना आढळतील, त्या सर्वांचे वर्तन जामीन अयोग्य व दखल पात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र अॅक्ट क्र. ३१-१९८२ च्या कायद्याचे कलम ७ प्रमाणे ६ महिने शिक्षा अथवा रू.५००/- दंड किंवा एकाच वेळी दोन्ही शिक्षा होऊ शकतील.
२) तसेच ज्या विद्यार्थ्याने परीक्षेस गैरमार्गाचा अवलंब करण्याच्या हेतुने पुस्तके/ हस्तलिखीत कागद / गाईड इत्यादी साहित्य जवळ बाळगले अथवा त्याच्या बाजूस आढळले असल्यास त्यास मंडळाच्या शिक्षा सुचिनुसार कार्यवाही करण्यात येईल.
३) परीक्षा केंद्रावर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर अनाधिकृतरित्या बदल करणे, लिहिलेली उत्तरपत्रिका बाहेर घेवून जाणे, बाहेरून लिहून आणणे, एका विद्यार्थ्याऐवजी दुसऱ्याने पेपर / अथवा परीक्षा देणे (तोतयागिरी करणे) तसेच परीक्षा केंद्रावर हत्यार घेवून येणे किंवा जवळ बाळगणे, केंद्रावरील कर्मचाऱ्याबरोबर प्रक्षोभक व्यवहार करणे इत्यादी प्रकारच्या गैरमार्ग प्रकरणी शिक्षा सुचिप्रमाणे संबंधितांची संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करून त्यांना त्या पुढील पाच परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करता येतो. तसेच पोलिसात तक्रार सुद्धा नोंदविता येते.
अशाच प्रकारे उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सुचनांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद शिक्षासुचिमध्ये करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांना नोंद घ्यावी.
दहावी बोर्डाच्या निकालानंतर पुढे काय | What Next after 10th Board Results
/*54745756836*/
Lovart AI is a fascinating evolution in design automation-imagine blending natural language with tools like Photoshop. The pixel art transformation feature especially shows how AI can enhance creativity, not just replace it. Lovart AI is clearly pushing the envelope.
Interesting take on building trust in online gaming! Transparency via blockchain, like with okking99 slot download, is key. Secure logins & fair play are vital for long-term player engagement, don’t you think? 🤔