ZOOM App I झूम एप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन शाळेला सुरुवात

By AviratEducation

Updated on:

Follow Us
---Advertisement---
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊनची परिस्थिती किती काळ चालणार आहे याबाबत सद्यपरिस्थितीत तरी अनिश्चीतताच आहे. अशात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता यावे यासाठी काही खाजगी शाळांकडून विशेषतः सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय मंडळाच्या शाळांकडून त्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला ऑनलाईन पद्धतीनेच सुरुवात केली आहे. शाळा बंद असल्या तरी त्यांचे नियमित वर्ग भरत आहेत. या केंद्रीय मंडळाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्येच सुरु होते मात्र यंदा लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शाळांना ते औपचारिक पद्धतीने सुरु करता येत नसल्याने त्यांनी ते व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून सुरु केले आहे.

                   झूम एप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन शाळेला सुरुवात

शाळांकडून झूम एप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना युझर आयडी आणि पवर्ड सेशनच्या लॉगिनसाठी पुरविण्यात येतो. त्यानंतर दिलेल्या वेळेत आपण लॉगिन करून त्या त्या विषयांच्या शिक्षकांचे लेक्चर बसायचे असते. प्रत्येक विषयाच्या तासिकेमध्ये किमान १० ते १५ मिनिटांची वेळ दिली जाते. ज्यामध्ये विद्यार्थी एक तासिका संपवून दुसऱ्या तासिकेची तयारी करू शकणार आहे. जेथे नियमित शाळेमध्ये सात विषयांच्या तासिका होतात तेथे या ऑनलाईन तासिकांमध्ये पाच विषयांच्या तासिका घेत असल्याची माहिती स्वतः शिक्षिका पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देता अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे हे या ऑनलाईन तासिकांचे उद्दिष्ट 
आहे.

App Download here


सांताक्रूझच्या बिलबॉन्ग इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळेमध्ये तर झूम ऍप आणि झोहो ऍप या दोन्हीचा वापर करून विद्यार्थ्यंसाठी व्हर्च्युअल क्लासेस घेत आलस्याची माहिती मुख्याध्यापिका निखत आझम यांनी दिली. ही एप्लिकेशन आमच्या शिक्षकांना शिकविताना ही विविध पीपीटी आणि व्हडिओ दाखविण्याची मुभा देत असल्याने शिकविणे आणखी सोपे होते. शिखक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद ऑनलाईन तासिकांना मिळत आहे. मायक्रोफोन सुविधेमुळे विद्यार्थी आपले प्रश्न शिक्षकांना विचारू शकतात, संवाद  साधू शकत.

@lokmat.com

/*54745756836*/

Leave a Comment